
प्रतिनिधी – अमोल खरगे
जालना जिल्ह्यात अवैधरित्या हत्यार बाळगणाऱ्यावर पोलिकांकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात सध्या क्राइम रेट वाढत चालला असून सध्या जालना शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या हत्यारे बाळगण्याचे प्रमाण वाढले आहे. मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग हे क्राइम च्या दिशेने भरकटत असून दिवसेंदिवस क्राइम वाढत असल्याने पोलिस प्रशासन सुद्धा अलर्ट मोड वर आले आहे. ह्याच पार्श्वभूमीवर दिनांक 13 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखा जालना च्या वतीने कारवाई करत एका इसमास अटक केली आहे.
मा. पोलिस अधीक्षक श्री अजयकुमार बंसल ह्यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री पंकज जाधव व त्यांच्या पथकाने सदरील कारवाई केल्याचे समजते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव हयाणी एक पथक तयार करत सदरील आरोपी ह्यास अटक केली असल्याचे समजते.
दिनांक 13 जुलै रोजी आरोपी अशोक भानुदास भोसले जवळ गावठी पिस्तूल असल्याची खबर सदरील पथकाला मिळाली होती त्यावरून सदरील आरोपीचा शोध घेत ह्या आरोपीला गावठी पिस्टलसह चाळगे मेगासिटि प्रवेशद्वार, खरपुडी रोड येथून ताब्यात घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ह्यावेळी आरोपी अशोक भानुदास भोसले ह्याच्या कडून पोलिसांना एक पिस्टल, तीन जिवंत काडतुस असे एकूण 41,200 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तर सदरील आरोपीविरुद्ध तालुका पोलिस ठाणे जालना येथे सरकारतर्फे राजेंद्र छगनराव वाघ, पोलिस उप-निरक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या फिर्यादिवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई मा. पोलिस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल व मा. अप्पर पोलिस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. पंकज जाधव, स.पो.नि. योगेश उबाळे, पो.उप.नि. राजेंद्र वाघ वसोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंबलदार प्रभाकर वाघ, रमेश राठोड, लक्ष्मीकांत आडेप, इरशाद पटेल, सतिष श्रीवास, किशोर पुंगळे, अशोक जाधवर आदिनी केली.
साप्ताहिक आर्यव्रत बातमीपत्र मध्ये आपली बातमी व जाहिरात देण्या करिता संपर्क : +91 99600 07982
साप्ताहिक आर्यव्रत च्या सर्व बातमी प्रिंट व सोशल मिडिया वरील सर्व बातमी एकाच ठिकाणी
https://whatsapp.co/channel/0029VaBbP522f3EKtH8Ajx1J