
भारताचे माजी गृह मंत्री कै शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त माजी आमदार मा. संजय पा वाघचौरे, पैठण शहर काँग्रेस अध्यक्ष निमेश पटेल,राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष उमेश पंडुरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान येथे पूर्णकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
या वेळी माजी आमदार संजय वाघचौरे यांनी बोलताना असे सांगितले की, शंकरराव चव्हाण साहेब यांच्या मुळे मराठवाड्याचा विकास झाला आहे तर जायकवाडी प्रकल्पामुळे औद्यगिक क्रांती झाली व एम आय डी सी आली .
जाहिरात साप्ताहिक आर्यव्रत
या वेळी शहर अध्यक्ष निमेश पटेल यांनी असे सांगितले की, चव्हाण साहेब यांनी पश्चिम महाराष्ट्राचा विरोध असतानाही जायकवाडी प्रकल्प उभा केला आजही आपणास विरोध करावा लागत आहे आपल्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी. आमच्या सोसायटीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली व माजी राज्यमंत्री अनिल पटेल व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन केले म्हणून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले. आज या ठिकाणी पुतळ्याची दुरवस्था झाली असून येथील टईल्स फरशी निघालेली आहे कोट्यवधींचा निधी येऊनही काम पूर्ण झाले नाही अशोकराव चव्हाण साहेब भाजप सत्ताधारी पक्षात असूनही येथे कोणी शासकीय अधिकारी जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित नाही.
समाजसेवक दिनेश पारीक यांनीही नाराजी व्यक्त करताना सांगितले की, उद्यान मध्ये अजून अनेक विकास कामे होणे गरजेचे आहे ह्या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक भाऊसाहेब पिसे, समाजसेवक दिनेश पारीख, नंदकिशोर नजन, ऍड वैभव चव्हाण महेश पवार, आबेद पठाण,प्राचार्य सुरेश पाटील, सखाराम पांडव,दिनेश माळवे शिवाजी सदलासे,यांच्यासह उद्यान येथील अधिकारी,कर्मचारी,महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
साप्ताहिक आर्यव्रत व आर्यव्रत सोशल मिडिया मध्ये बातमी देणे झाले आणखीन सोपे…
बातमी व जाहिरात करिता संपर्क : +91 99600 07982 / +91 98903 84782
साप्ताहिक आर्यव्रत व आर्यव्रत सोशल मिडिया च्या सर्व बातमी एकाच ठिकाणी
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻