क्राईम

चार हजाराची लाच घेताना पोलीस हवालदार जेरबंद…

प्रतिनिधी : गजानन माळकर पाटील

मंठा  : पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस हवालदार याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती तर सदरील हवलदार ह्यास लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाकडून रांगेहाथ पकडण्यात आले. तर सदरची कारवाई जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

घटनेची संपूर्ण माहिती अशी की तक्रारदार व त्यांच्या गावातील व्यक्ति यांच्या १५ जून रोजी भांडणे झाले होते त्यावरून त्यांनी एकमेकांवर क्रॉस गुन्हे दखल केले होते हाणामारीत तक्रारदार जखमी होऊन जालना येथे उपचार घेत असतांना संबंधित हवालदार त्यांचा जवाब घेण्यास खाजगी वाहनाने आले होते त्या वाहनाचा खर्च १५०० व तपासात मदत करण्यासाठी ३००० हजर रुपये असे एकूण ४५०० रपाये लाचेची मागणी राठोड यांनी तक्रातदार यांच्या कडे केली तकरीची पडतांनीची केली असता तक्रारदार व पंच यांच्या समक्ष तडजोड अंती ४००० स्वीकारण्याचे कबूल केले आहे.
सापळा रचून केलेल्या या कारवाई मध्ये सापळा अधिकारी पोलिस उप अधीक्षक बाळू एस जाधवर लाच प्रतिबंध विभाग छ. संभाजीनगर,सहाय्यक सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक शरडचन्द्र रोडगे लाच प्रतिबंध विभाग जालना , मार्गदर्शक पोलिस अधीक्षक लाच प्रतिबंध विभाग छ. संभाजीनगर माधुरी कांगणे, सुरेश नाईकनवरे, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक तथा पो. उप अधिक्षक ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर. सापळा पथक – पो. हा. भालचंद्र बिनोरकर, गजानन घायवट, गणेश चेके, गजेंद्र भुतेकर, मनोहर भुतेकर, अमोल चेके, शिवलिंग खुळे, गजानन खरात ला. प्र. वि. जालना आदींचा सहभाग होता.

घटनेची गांभीर्य लक्षात घेता लाच प्रतिबंध विभागाकडून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ टोल फ्री नंबर १०६४ यावर संपर्क साधावा.

शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.